लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोलापूर महापालिकेत बालरोगतज्ञांची बैठक

सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर आणि आयुक्त यांच्या निर्देशानुसार कोरोनाची तिसरी लाट आणि लहान मुलांची कोरोना संसर्गापासून दक्षता घेण्यासंदर्भात आराखडा सिद्ध करण्यात येत आहे.

बेंगळुरूमध्ये रेमडेसिविरच्या रिकाम्या कुपीमध्ये ग्लुकोज भरून विक्री करणार्‍या एका डॉक्टरसह वॉर्डबॉयला अटक

शहरात नकली रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणारे खासगी रुग्णालयाचे डॉ. सागर आणि वॉर्डबॉय कृष्णा यांना पोलिसांनी अटक केली आहे. अर्धेच इंजेक्शन रुग्णांसाठी वापरून उरलेले काळ्या बाजारात विकत होते.

कोरोना रुग्णांच्या साहाय्यासाठी नागपूर येथे रिक्शाचालकाने रिक्शाला रुग्णवाहिकेत पालटले !

दळणवळण बंदीमुळे शहरातील अनेक रिक्शाचालक बेरोजगार झाले आहेत. या स्थितीत शहरातील रिक्शाचालक श्री. आनंद वर्धेवार यांनी स्वतःतील कल्पकतेने रिक्शाला रुग्णवाहिकेत पालटून ते गरजू रुग्णांना नि:शुल्क साहाय्य करत आहेत.

आयुर्वेदाने कोरोनावर केलेल्या चाचण्या, त्याला मिळालेले यश आणि षड्यंत्र

आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने आणि संशोधनाने निर्माण करण्यात आलेल्या ‘आयुष ६४’ नामक या आयुर्वेदाच्या औषधाने सौम्य अन् मध्यम लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांना लाभ होत असल्याचे संशोधनांती घोषित केले.

दळणवळण बंदीच्या काळात २५ दिवसांत पोलिसांनी १ कोटी रुपयांचा दंड वसूल केला

दंड वसूल करणे हा आमचा हेतू नसून नागरिक नियम पाळत नसल्याने आम्हाला कारवाई करावी लागत आहे.

DRDO चे कोरोनावरील औषध ‘२ डीजी’ हे रुग्णांना वापरण्यासाठी उपलब्ध !

हे औषध पावडरच्या रूपात असणार आहे. हे औषध रुग्णालयात असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व न्यून करते.

गोमूत्र अर्क प्यायल्यामुळे कोरोना झाला नाही ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र प्यायला पाहिजे, असे मत भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.

चीनकडे लिक्विड ऑक्सिजन नसल्याने त्यासाठी नेपाळची भारताकडे मागणी !

चीनच्या भरवश्यावर भारताला डोळे वटारून दाखवणार्‍या नेपाळला त्याच्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी शेवटी भारताकडेच हात पसरवावे लागत आहेत,

कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत ७ नव्या रुग्णवाहिका दाखल

कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून ७ नव्या रुग्णवाहिका दाखल झाल्या असून याचा लाभ जिल्हा उपरुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्र यांना होणार आहे.

गोव्यात दिवसभरात ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ३१४ नवीन रुग्ण

राज्यातील १० आरोग्य केंद्रांमध्ये १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत.