सोलापूर येथे मुलांची विशेष तपासणी मोहीम; २ लाख मुलांची पडताळणी पूर्ण !

३१ सहस्र ७९२ मुलांची पडताळणी करून त्यांना जागीच औषधोपचार देण्यात आला.

महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करतांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी बंधनकारक !

महाराष्ट्रातून  कर्नाटकात प्रवेश करणार्‍यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ अहवाल किंवा कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा दाखला असल्याविना प्रवेश दिला जाणार नाही.

कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढत जाणार असल्याने प्रत्येक कुटुंबाला ४ लाख रुपये देऊ शकत नाही !

सर्वोच्च न्यायालयात सरकारचे दुसरे प्रतिज्ञापत्र !
डिसेंबरपर्यंत २१६ कोटी नाही, तर केवळ १३५ कोटी डोस उपलब्ध होणार ! – केंद्रशासनाचा नवा दावा

कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकारामुळे नियमांचे काटेकोर पालन करा ! – जागतिक आरोग्य संघटना

प्रथम भारतात आढळून आलेल्या कोरोनाच्या ‘डेल्टा’ या प्रकाराचे जगातील जवळपास ८५ देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या प्रकारांमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संसर्ग होणारा आहे.

कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये फिशरचे प्रमाण वाढल्याचे वैद्यकीय तज्ञांचे निरीक्षण !

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घेतले जाणारे आयुर्वेदिक काढे, तसेच डॉक्टरांकडून होणारा अँटिबायोटिक्सचा अतिरिक्त वापर यांमुळे कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये फिशरचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ञांनी नोंदवले आहे.

‘गोमेकॉ’चा ‘सुपर स्पेशालिटी’ विभाग आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय यांच्या व्यतिरिक्त अन्य सर्व शासकीय रुग्णालयांचा ‘कोरोना रुग्णालया’चा दर्जा हटवला

सर्व शासकीय रुग्णालयांचा ‘कोरोना रुग्णालया’चा दर्जा हटवला आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला, तरी रुग्णालयात भरती होण्याची शक्यता अल्प ! – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

आय.सी.एम्.आर्. च्या अहवालानुसार संसर्ग झालेल्या या रग्णांमध्ये १७ टक्के जणांना कोणतीही लक्षणे नव्हती, तर १० टक्के जणांना रुग्णालयात भरती करावे लागले.

बनावट औषधांची विक्री केल्याप्रकरणी औषध वितरकास अटक !

नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍यांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे

‘ॲपेक्स हॉस्पिटल’ला अनुमती देणारे आयुक्त नितीन कापडणीस यांच्यावर कारवाई करा ! – भाजपचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

रुग्णांच्या मृत्यूस जेवढे ‘ॲपेक्स हॉस्पिटल’ उत्तरदायी आहे, तेवढेच त्यांना अनुमती देणारे आयुक्त नितीन कापडणीस हेही उत्तरदायी आहेत.

कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ हा नवीन प्रकारचा विषाणू गोव्यात आढळला नाही; मात्र शासन सतर्कता बाळगणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ हा नवीन प्रकारचा विषाणू गोव्यात आढळलेला नाही.