पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे ५ परिवार देवता मंदिरांच्या जिर्णोद्धार कामाचे भूमीपूजन
५ परिवार देवतांच्या मंदिरांचा जिर्णोद्धार आणि श्री विठ्ठल मंदिरातील सभा मंडपाचे सुशोभिकरण या कामांचे भूमीपूजन २५ फेब्रुवारी या दिवशी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.