पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – मागील ४ वर्षांपासून स्ट्रेचरवर असलेले सोलापूर येथील श्रीविठ्ठलभक्त डॉ. राजाराम होमकर यांची श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. डॉ. होमकर यांची श्रीविठ्ठल दर्शनाची पुष्कळ दिवसांपासून इच्छा होती. मंदिर समितीच्या साहाय्यामुळे ही इच्छा पूर्ण झाली. डॉ. राजाराम होमकर यांना अल्झायमरचा त्रास असल्याने त्यांची मान वगळता पूर्ण शरीर निश्चल आहे.
डॉ. होमकर यांच्या वडिलांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. विठ्ठल जोशी यांना विनंती केल्यानंतर त्यांनी समितीच्या कर्मचार्यांना सांगून स्ट्रेचरवरून डॉ. होमकर यांना श्रीविठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आणण्यात आले.