अरबी समुद्रात पाकमधून आलेल्या नौकेतून २ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
ही नौका गुजरात येथील पोरबंदर येथे आणण्यात आली आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानातून पाठवण्यात आले होते, असा संशय आहे.
ही नौका गुजरात येथील पोरबंदर येथे आणण्यात आली आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानातून पाठवण्यात आले होते, असा संशय आहे.
हे समुद्रावरून समुद्रामध्ये मारा करणारे क्षेपणास्त्र असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.
भारतीय तटरक्षक दलाने गुजरात येथील अरबी समुद्रात भारतीय सागरी सीमेमध्ये घुसलेल्या ‘यासीन’ नावाच्या नौकेला कह्यात घेतले.
भारत सरकारने भारतीय मासेमार्यांना भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती होण्यासाठी तेथे दर्शक लावणे आवश्यक आहे. ते न केल्याने मासेमार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे !
सातारा येथील महासैनिक भवन येथे ‘नौदलदिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय नौसेनेचे निवृत्त व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार यांच्या हस्ते नौसेनेतील निवृत्त सैनिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तेव्हा ते बोलत होते.
नौदलातील ‘एम्.आय.जी. २९ के’ या विमानाच्या देखभाल-दुरुस्तीची सुविधा भारतात नव्हती. ते रशियाकडून करून घेतले जात होते. विमानांसाठी सर्व सुविधा भारतात निर्माण करण्याविषयी लेफ्टनंट कमांडर सूरज यांनी प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले !
लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चिनी सैन्यासमवेतच्या संघर्ष आणि तणाव यांच्या घटनांनंतर हिंदी महासागरात भारताचे नौदल सतर्क आहे. चीनच्या प्रत्येक नौकेवर लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती भारताचे नवनियुक्त नौदलप्रमुख अॅडमिरल आर्. हरिकुमार यांनी दिली.
आयएन्एस् वेला ही पाणबुडी सागरी सीमांचे संरक्षण करण्यात आणि नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. कुठल्याही संकटाचा सामना करण्यास ही पाणबुडी सक्षम आहे, असे नौदलप्रमुखांनी स्पष्ट केले.
अशा राष्ट्रघातक्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ! – संपादक
भारतीय सैन्याच्या अखत्यारित असलेल्या दाबोळी (गोवा), पुणे आणि श्रीनगर या विमानतळांवरून येत्या डिसेंबरनंतर विदेशात जाणार्या विमानांच्या उड्डाणावर बंदी येण्याची शक्यता आहे.