कलवरी वर्गातील चौथी पाणबुडी ‘आयएन्एस् वेला’ नौदलाच्या सेवेत दाखल !

आयएन्एस् वेला

मुंबई – कलवरी वर्गातील चौथी पाणबुडी ‘आयएन्एस् वेला’ २५ नोव्हेंबर या दिवशी एका कार्यक्रमाद्वारे नौदलाच्या सेवेत दाखल झाली. मुंबईत नौदल तळावर झालेल्या या कार्यक्रमात स्वतः नौदलाचे प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह या वेळी उपस्थित होते. याआधी कलवरी वर्गातील तीन पाणबुड्या आयएन्एस् कलवरी, खांदेरी, करंज या नौदलात दाखल झाल्या आहेत.

कार्यक्रमात ‘आयएन्एस् वेला’ पाणबुडीवर नौदलाचा झेंडा सन्मानपूर्वक फडकवण्यात आला. यानिमित्ताने नौदल प्रमुखांनी आयएन्एस् वेलाचे सारथ्य करणारे नौदल अधिकारी आणि नौसैनिक यांच्याशी संवाद साधला. आयएन्एस् वेला ही पाणबुडी सागरी सीमांचे संरक्षण करण्यात आणि नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. कुठल्याही संकटाचा सामना करण्यास ही पाणबुडी सक्षम आहे, असे नौदलप्रमुखांनी स्पष्ट केले.