‘सुपरसॉनिक ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

नौदलाचे मोठे यश

‘सुपरसॉनिक ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

नवी देहली – भारतीय नौदलाने ११ जानेवारी या दिवशी ‘सुपरसॉनिक ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले. पश्‍चिम किनार्‍यावर तैनात असलेली लढाऊ युद्धनौका ‘आयएन्एस् विशाखापट्टनम्’ वरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. या वेळी या क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य भेदत लक्षित युद्धनौकेवर अचूक मारा केला. हे समुद्रावरून समुद्रामध्ये मारा करणारे क्षेपणास्त्र असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.