नौदलाच्या पाणबुडी कार्यक्रमाची माहिती फुटल्याच्या प्रकरणी २ निवृत्त आणि १ विद्यमान अधिकार्‍यांसह ५ जण अटकेत

अशा राष्ट्रघातक्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ! – संपादक

नवी देहली – नौदलाच्या पाणबुडी ताफ्याची खरेदी आणि देखभाल प्रक्रियेची व्यावसायिक माहिती फुटल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) नौदलाचे २ निवृत्त अधिकारी, १ विद्यमान कमांडर आणि २ नागरिक यांना अटक केली आहे. नौदलाच्या मुख्यालयानेही अंतर्गत अन्वेषण चालू केले आहे. सीबीआयने याप्रकरणी देहली, मुंबई आणि भाग्यनगर येथे १९ ठिकाणी छापे टाकले आहेत. विद्यमान कमांडरने निवृत्त अधिकार्‍यांना सध्याच्या ‘कीलो क्लास’ पाणबुडीच्या आधुनिकीकरण प्रकल्पाची माहिती दिली होती.