अरबी समुद्रात पाकमधून आलेल्या नौकेतून २ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

पाकमधून आलेल्या नौकेतून २ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

नवी देहली – अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (‘एन्.सी.बी.’ने) आणि भारतीय नौदल यांनी संयुक्तपणे अरबी समुद्रात एका नौकेवर कारवाई करून ७६३ किलो अमली पदार्थ जप्त केले. याचे आंतरराष्ट्रीय बाजारात २ सहस्र कोटी रुपये इतके मूल्य आहे. या अमली पदार्थाचा पुरवठा मुंबईत केला जाणार होता, असे सांगण्यात येत आहे. ही नौका गुजरात येथील पोरबंदर येथे आणण्यात आली आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तानातून पाठवण्यात आले होते, असा संशय आहे.