कारगिल (लडाख) – चीनने आमच्याकडून सहस्रो किलोमीटर भूमी हिसकावून घेतली आहे; मात्र पंतप्रधान एक इंचही भूमी गेली नसल्याचे ते सांगत आहेत. हे पूर्णपणे खोटे आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर येथे एका सभेत केली.
The Indian and Chinese troops are locked in an over 3 year confrontation in certain friction points in #Ladakh even as the two sides completed disengagement from several areas following extensive diplomatic and military talks.@RahulGandhi @INCIndia https://t.co/BXigjXa1jo
— The Telegraph (@ttindia) August 25, 2023
संपादकीय भूमिकावर्ष १९६२ च्या युद्धात चीनने भारताची ३८ सहस्र चौरस किलोमीटर भूमी बळकावली. यावर राहुल गांधी यांचे पणजोबा आणि तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी संसदेत, ‘जेथे गवताची पातीही उगवत नाहीत, अशीच भूमी चीनने बळकावली आहे’, असे म्हणत याचे समर्थन केले होते. नेहरूंच्या आत्मघाती ‘हिंदी-चिनी भाई भाई’च्या धोरणामुळे ही भूमी चीनने हिसकावली. त्याविषयी राहुल गांधी तोंडातून एक शब्दही कधी काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! |