कंत्राटदाराने खंडणी न दिल्याने गुंडांनी बांधकाम चालू असलेला रस्ता खोदला !

उत्तरप्रदेशमध्ये अद्यापही गुंडगिरी शिल्लक असून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. या गुंडांविषयी सरकारला अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !

गोव्यात ७८ टक्के वेश्याव्यवसाय हॉटेल आणि ‘लॉज’ यांमधून चालतो !

एका सामाजिक कार्यकर्तीचा ‘राज्यात ‘रेडलाईट’ क्षेत्र असल्यास महिला आणि तरुणी सुरक्षित रहातात. ‘रेडलाईट’ क्षेत्र ही समाजाची ढाल आहे’, हा युक्तीवाद समाजासाठी किती घातक आहे ? याविषयी डॉ. रूपेश पाटकर यांनी सोदाहरण माहिती दिली.

अभिनेते अमिताभ बच्‍चन यांच्‍या विरोधात ‘कॅट’ची केंद्रशासनाकडे तक्रार !

विज्ञापनातून जनतेची दिशाभूल केल्‍याप्रकरणी ‘जनरल कॉन्‍फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे (कॅट) सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी ज्‍येष्‍ठ अभिनेते अमिताभ बच्‍चन यांच्‍या विरोधात ग्राहक व्‍यवहार, अन्‍न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय यांच्‍याकडे तक्रार केली आहे.

कर्नाटकने म्हादई नदीवरील धरणासाठी काढली निविदा !

कर्नाटक येथील खानापूरस्थित ‘कर्नाटक निरवरी निगम’ या शासकीय आस्थापनाने ही निविदा काढली आहे. एक वर्षात हे काम पूर्ण करण्याचा उल्लेख निविदेत करण्यात आला आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने रामसेतूला राष्‍ट्रीय स्‍मारक घोषित करणारी मागणी करणारी फेटाळली याचिका !

याचिकाकर्ते अशोक पांडे यांनी मागणी करतांना म्‍हटले हेते की, या माध्‍यमातून लोक रामसेतूचे दर्शन घेऊ शकतील. यासह रामसेतूला राष्‍ट्रीय स्‍मारक घोषित करण्‍याची मागणीही या याचिकेच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आली होती.

बेंगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध उद्योजक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ संजय गुप्‍ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला सदिच्‍छा भेट !

आश्रम पाहून अभिप्राय व्‍यक्‍त करतांना श्री. संजय गुप्‍ता म्‍हणाले की, आश्रमातील वातावरण शांत आणि स्‍थिर आहे. साधक आश्रमात राहून पूर्ण समर्पणभावाने करत असलेले कार्य अद़्‍भुत आहे.

केदारनाथ मंदिरातील गर्भगृहात अतीमहनीय व्यक्तींनाच प्रवेश : पुजार्‍यांचा आक्षेप  

मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद करण्यातच्या विरोधात संपूर्ण तीर्थ पुरोहित समाज एकवटला असल्याचे श्री. संतोष त्रिवेदी यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने रामसेतूला ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली !

डॉ. स्वामी यांनीही रामसेतूला ‘राष्ट्रीय वारसा’ घोषित करण्याची मागणी काही वर्षांपूर्वी एका याचिकेद्वारे केली असून ती अद्याप प्रलंबित आहे.

मार्च २०२४ पासून स्लीपर कोच असलेली ‘वन्दे भारत एक्स्प्रेस’ (Vande Bharat Express) धावणार !

सध्या देशातील विविध भागांत धावणार्‍या ३३ वन्दे भारत रेल्वेगाड्यांत केवळ बसून प्रवास करण्याची व्यवस्था आहे. आता मात्र झोपून प्रवास करता येईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी दिली.

कर्णावती (गुजरात) येथील शाळेने हिंदु मुलांकडून करून घेतले नमाजपठण !

याऐवजी जर एखाद्या शाळेतील मुसलमान अथवा ख्रिस्ती विद्यार्थ्यांना हिंदु धर्मानुसार उपासना करण्यास सांगण्यात आले असते, तर एव्हाना देशभरात ‘शिक्षणाचे भगवेकरण’, ‘लोकशाहीची हत्या’, ‘अल्पसंख्यांकांवरील अरिष्ट’ अशा प्रकारे आरोळी ठोकत शाळेला वाळीत टाकण्याची धमकी दिली गेली असती, हे जाणा !