उत्तरप्रदेशातील शाहजहापूर येथील घटना !
शाहजहापूर (उत्तरप्रदेश) – आतापर्यंत खंडणी न दिल्यामुळे गुंडांकडून एखाद्याची हत्या करण्यापासून ते अपहरणापर्यंतचे कृत्य करण्याच्या घटना घडल्या असतांना येथे एक नवीन घटना घडली आहे. येथे रस्त्याचे बांधकाम करणार्या कंत्राटदाराने खंडणी न दिल्याने गुंडांनी जेसीबीद्वारे संपूर्ण ७ किमी अंतराचा रस्ता खोदल्याची घटना घडली. तसेच कामगारांना मारहाणही करण्यात आली. या गुंडांनी स्वतःला स्थानिक आमदारांची माणसे असल्याचाही दावा केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून ३ जणांना अटक केली आहे; मात्र मुख्य सूत्रधार जगवीर सिंह पसार आहे.
शाहजहांपुर में दबंगों ने रंगदारी के चलते सड़क को बुलडोजर से खोद डाला, पहले की थी कर्मचारियों से मारपीट। जानिए क्या है पूरा मामला।#Shahjahanpur #Bulldozer #UttarPradesh pic.twitter.com/40yOmbEQ9U
— UP Tak (@UPTakOfficial) October 6, 2023
जैतीगंज ते दातागंज अशा मार्गावर या रस्त्याचे काम चालू होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याचे कंत्राट गोरखपूर येथील शकुंतला इंटरप्राइजेस या आस्थपनाला देण्यात आले आहे. या आस्थापनाचे मालक श्री. शकुंतला सिंह यांनी सांगितले की, त्यांच्याकडे जगवीर सिंह नावाची व्यक्ती आली होती. जगवीर सिंह याने सांगितले, ‘मी स्थानिक आमदाराचा माणूस आहे.’ त्यानंतर त्याने खंडणी मागितली. खंडणी देण्यास नकार दिल्यावर तो चिडून निघून गेला. त्यानंतर काही दिवसांनी त्याने त्याच्या साथीदारांसह येथे जेसीबीद्वारे रस्ता खोदून टाकला.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये अद्यापही गुंडगिरी शिल्लक असून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. या गुंडांविषयी सरकारला अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे ! |