केदारनाथ (उत्तराखंड) – येथील केदारनाथ मंदिरातील भाविकांची वाढती गर्दी पहाता सर्वसामान्य भाविकांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद करण्यात आला आहे; मात्र अतीमहनीय व्यक्तींना गर्भगृहात प्रवेश दिला जात आहे. हे निर्बंध परंपरेच्या विरोधात असल्याचा आरोप चारधाम महापंचायतीचे उपाध्यक्ष आणि केदारनाथ तीर्थक्षेत्राचे पुजारी श्री. संतोष त्रिवेदी यांनी केला.
श्राद्ध पक्षाच्या कालावधीत केदारनाथ मंदिरात पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. यासाठी दूरदूरवरून लोक येथे येतात. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद करण्याच्या विरोधात संपूर्ण तीर्थ पुरोहित समाज एकवटला असल्याचे श्री. संतोष त्रिवेदी यांनी सांगितले.
केदारनाथ धाम के गर्भ गृह में VIP की एंट्री पर तीर्थ पुरोहितो ने जताई आपत्ति #KedarnathDham #ViP https://t.co/yw990pStGQ
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) October 5, 2023
संपादकीय भूमिकाभक्तांना कुठल्याही भेदभावाविना देवाचे दर्शन घडवणे आवश्यक आहे, हे आयोजकांनी लक्षात घ्यावे ! |