राजभवन परिसरातील वाहतूककोंडीमुळे शपथविधी समारंभास १३ मिनिटे विलंब !

राजभवन येथील मंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमामुळे गिरगाव चौपाटी ते राजभवन या मार्गात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. त्यात अडकल्यामुळे मंत्रीपदाची शपथ घेणारे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना सोहळ्याला येण्यास विलंब झाला.

महाराष्ट्रात मंत्रीमंडळाचा विस्तार : १८ आमदारांना मंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये आणखी १८ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. ९ ऑगस्ट या दिवशी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन सरकारमधील १८ आमदारांना मंत्रीपद आणि गोपनीयता यांची शपथ दिली.

आज होणार मंत्रीमंडळाचा विस्तार !

महाराष्ट्राच्या रखडलेल्या मंत्रीमंडळाचा विस्तार ९ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. सकाळी ११ वाजता राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंत्र्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ देणार आहेत.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज होणार विधीमंडळाच्या सल्लागार समितीची बैठक !

मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात येईल.

जामिनावर बाहेर आलेल्या धर्मांध गुंडाचे जल्लोषात स्वागत !

सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्याप्रकरणी पोलिसांनी या गुंडासह त्याच्या ६ साथीदारांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुंड ८ मास आर्थर रोड कारागृहात होता.

संजय राऊत यांना कारागृहातून लेखनाची अनुमती कशी मिळते ? – संदीप देशपांडे, नेते, मनसे

दैनिक ‘सामना’मध्ये ७ ऑगस्ट या दिवशी ‘रोखठोक’ या सदरात संजर राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी ‘ईडी’च्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

गणपति विशेष गाड्यां’साठी ३० टक्के अधिक भाडे आकारल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त !

हिंदूंच्या सणांच्या वेळी भाडे वाढवणारे सरकार निधर्मी म्हणायचे का ?

(म्हणे) चित्रपटाला ‘हम दो हमारे बारह’ असे शीर्षक देणे, हा इस्लामोफोबिया !’ – राणा अय्युब, पत्रकार

भारतात लोकसंख्यावाढ नेमकी कुणामुळे होत आहे, हे सर्वश्रुत असतांना त्यात ‘इस्लामफोबिया’ कुठे आला ?

मानवाधिकार आयोगाकडून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना नोटीस !

तक्रार करूनही कारवाई न करणार्‍या कर्तव्यचुकार पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

केदार दिघे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संमत !

दिघे यांच्याविरुद्ध बलात्कार पीडितेला धमकावल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.