विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज होणार विधीमंडळाच्या सल्लागार समितीची बैठक !

मुंबई – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३.३० वाजता विधीमंडळाच्या सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज आणि कालावधी निश्चित करण्याविषयी चर्चा होणार आहे.

मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात येईल.


विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून असण्याची शक्यता !

विधीमंडळ सचिवालयाकडून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० ते १८ ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याचे कार्यालयीन पत्र विधीमंडळाच्या कामकाजाशी संबंधित सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांना पाठवले होते. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ९ ते १८ ऑगस्ट या कालावधीतील सर्व सुट्ट्या सरकारकडून रहित करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र सरकारकडून अधिवेशनाचा अधिकृत कालावधी १७ ते २३ ऑगस्ट असा घोषित करण्यात आलेला आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार आणि त्यानंतर अधिवेशनाच्या संबंधित करावयाची प्रशासकीय सिद्धता लक्षात घेता अधिवेशनाला १७ ऑगस्ट या दिवशी प्रारंभ होईल, असे मंत्रालयातील काही प्रशासकीय अधिकार्‍यांनी सांगितले.