‘आरे’तील ‘मेट्रो ३’च्या कारशेडसाठी आता झाडे तोडणार नाही ! – आश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका

‘मेट्रो ३’च्या कारशेडचे काम हे भूमीअंतर्गत होणार असून या कामात आलेल्या अडथळ्यांमुळे त्याला विलंब झाला आहे. त्यामुळे या कामाच्या निधीत १० सहस्र २७० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

दीड लाख सदोष राष्ट्रध्वजांचा पुरवठा करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करा ! – किशोरी पेडणेकर, माजी महापौर

एवढ्या मोठ्या प्रमाणात सदोष राष्ट्रध्वज सिद्ध करून त्यांचा पुरवठा होईपर्यंत त्याविषयी कुणालाच न कळणे हे गंभीर आहे. अशा पाट्याटाकू कंत्राटदारांवर कठोर कारवाई केल्यासच इतरांना जरब बसेल !

बंडखोरी करून येतो, त्याला सर्वांत आधी मंत्रीपद मिळते ! – अपक्ष आमदार बच्चू कडू

मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात स्थान न मिळाल्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी १० ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी १३ सहस्र ६०० रुपये हानीभरपाई देऊ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मागील २ मासांत राज्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. हे आर्थिक साहाय्य ३ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड !

शिवसेनेतील काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतरही अंबादास दानवे हे ठाकरे यांच्या समवेतच राहिले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी २२ ऑगस्टला होणार !

सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमण्णा हे २६ ऑगस्ट या दिवशी निवृत्त होणार असल्याने त्यांच्याच घटनापिठासमोर ही सुनावणी कायम रहाण्याची शक्यता आता अल्प आहे.

बलात्काराच्या आरोपात अर्भकाचा ‘जनुक’ आरोपीशी जुळला नाही, तरी पीडितेच्या जबाबावर अविश्वास दाखवता येणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

नवी मुंबईतील एकाने बलात्काराच्या आरोपाप्रकरणी जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळतांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी टिपणी केली.

अकार्यक्षम गृहनिर्माण संस्था आणि विकासक यांच्या विरोधात दहिसर येथे स्थानिक रहिवाशांची एकजूट !

मुंबई उपनगरातील दहिसर पूर्व येथील श्री संभाजीनगर – शिवटेकडी येथील गृहनिर्माण संस्था आणि विकासक यांच्या विरोधात येथील स्थानिकांनी एकजूट केली आहे. येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प गेल्या १८ वर्षांपासून प्रलंबित आहे.

संजय राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्याने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची टीका !

पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात झालेल्या गंभीर आरोपांमुळे महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले होते; पण त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपच्या नेत्या सौ. चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यपालांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक !

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयी सामाजिक माध्यमांवरून अश्लील आणि आक्षेपार्ह लिखाण प्रसिद्ध केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी प्रदीप भालेकर या माहिती अधिकार कार्यकर्त्याला ७ ऑगस्टच्या रात्री अटक केली.