मुंबई – भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक असलेले संजय राऊत यांना कारागृहातून लेखनाची अनुमती कशी मिळते ? असा प्रश्न मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. दैनिक ‘सामना’मध्ये ७ ऑगस्ट या दिवशी ‘रोखठोक’ या सदरात संजर राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी ‘ईडी’च्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
‘दैनिक ‘सामना’मध्ये राऊत यांचे ‘रोखठोक’ हे सदर प्रसिद्ध झाले होते. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र्यसेनानी नाहीत कि त्यांना कारागृहामधून लेखनाची अनुमती मिळावी कि त्यांच्या नावावर दुसरेच कुणी लिहीत आहे ?’, असे ट्वीट देशपांडे यांनी केले आहे.