बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रासपचे महादेव जानकर उभे रहाण्याची शक्यता

डावीकडून महादेव जानकर आणि सुप्रिया सुळे

मुंबई – भाजपने यंदा बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याचे निश्चित करून राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले आहे; परंतु त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे बारामती मतदारसंघातून उमेदवार म्हणून उतरून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे रहाणार असल्याचे संकेत पक्षाच्या इंदापूर येथील सभेत देण्यात आले. जानकर हे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आहेत. सध्या त्यांच्यासह आणखी एक असे दोनच आमदार त्यांच्या पक्षाचे आहेत. वर्ष २००४ मध्ये जानकर माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्याविरोधात उभे ठाकले होते.