मुंबई येथील हाजीअली दर्गा येथे आतंकवादी आक्रमणाची धमकी !

मुंबई – महालक्ष्मी येथील हाजीअली दर्गा येथे आतंकवादी आक्रमणाची धमकी देण्यात आली आहे. याविषयी धमकीचा दूरभाष ३ नोव्हेंबर या दिवशी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला उल्हासनगर येथून आला होता. या वेळी अज्ञाताने १७ आतंकवादी येणार असल्याचे सांगितले. यानंतर हाजीअली परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नंतर चौकशी केली असता, संबंधित क्रमांक बंद असल्याचे आढळून आले, तसेच ‘संबंधित अज्ञात व्यक्ती मानसिक रुग्ण असून तिच्यावर उपचार चालू आहेत’, असे समजते.