‘मुंबई’ असे नामांतर होऊनही कागदोपत्री मुंबई उच्च न्यायालयाचा उल्लेख ‘बाँबे हायकोर्ट’ !

वर्ष १९९५ मध्ये ‘बाँबे’ शहराचे नामांतर ‘मुंबई’ असे करण्यात येऊनही आजही येथील उच्च न्यायालयाचा कागदोपत्री उल्लेख ‘बाँबे हायकोर्ट’ असाच करण्यात येत आहे.

९ नोव्हेंबरला संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर निकाल

मुंबईतील विशेष पी.एम्.एल्.ए. न्यायालयाने खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. ९ नोव्हेंबरला त्यांच्या जामिनाच्या अर्जावर निकाल दिला जाणार आहे.

७ नोव्हेंबर या दिवशी मुंबईतील बाणगंगा येथे होणार महाआरती !

मुंबईतील काशी म्हणून ओळख असलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगेची त्रिपुरारी पौर्णिमेच्या (७ नोव्हेंबर) दिवशी सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होणार आहे. या सोहळ्याला उज्जैन पिठाचे जगद्गुरु सद्धर्मसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु राजदेशीकेंद्र सिद्धलिंग शिवाचार्य भगवत्पाद महास्वामीजी उपस्थित रहाणार आहेत.

… तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री रहाता येणार नाही ! – उल्हास बापट, घटनातज्ञ

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे ४० आमदार अपात्र ठरवले, तर राज्यात बहुमताचा आकडा १२० पर्यंत खाली येतो.

दादर (मुंबई) येथील छबीलदास शाळेत ४ सिलेंडरचा स्फोट !

दादर (पश्चिम) येथील छबीलदास शाळेत २ नोव्हेंबर या दिवशी पहाटे ५ वाजताच्या कालावधीत एकापाठोपाठ ४ सिलेंडरचे स्फोट झाले. स्फोटामुळे आग लागून ३ जण घायाळ झाले आहेत.

पक्ष्यांच्या विष्ठेमुळे मंत्रालय आणि विधीमंडळ परिसरातील नेते आणि राष्ट्रपुरुष यांच्या पुतळ्यांचे विद्रूपीकरण !

राष्ट्रपुरुषांचा अवमान होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी !

नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीच्या नावाखाली उघडपणे चालणार्‍या अश्लील नृत्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

अश्लीलता पसरवणार्‍यांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ?

महाराष्ट्रातून गेलेल्या सर्व प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

मागील १५ दिवसांपासून राज्यातील उद्योगक्षेत्राविषयी नकारात्मक वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या सर्व प्रकल्पांशी एका मासाभरात श्वेतपत्रिका काढण्यात येईल.

येत्या वर्षभरात राज्यातील ५ लाख युवकांना रोजगार देऊ ! – मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकासमंत्री

१ नोव्हेंबर या दिवशी एलफिन्स्टन टेक्निकल महाविद्यालयात कौशल्य विद्यापिठाच्या शिक्षणाला प्रारंभ करण्यात आला.

महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी; मात्र नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावणीच्या नावाखाली उघडपणे चालणार्‍या अश्‍लील नृत्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

अश्‍लीलता पसरवणार्‍यांवर पोलीस कारवाई का करत नाहीत ?