९ नोव्हेंबरला संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर निकाल

खासदार संजय राऊत

मुंबई – मुंबईतील विशेष पी.एम्.एल्.ए. न्यायालयाने खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. ९ नोव्हेंबरला त्यांच्या जामिनाच्या अर्जावर निकाल दिला जाणार आहे. २१ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती.