…तर रस्त्यावर उतरून हलाल परिषदेला तीव्र विरोध करावा लागेल ! – प्रभाकर भोसले, संस्थापक अध्यक्ष, श्री शिवकार्य प्रतिष्ठान

१२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे परिषदेचे आयोजन

प्रभाकर भोसले, संस्थापक अध्यक्ष, श्री शिवकार्य प्रतिष्ठान

मुंबई – हलाल प्रमाणपत्र देणार्‍या ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ या संघटनेकडून मुंबईवरील ‘२६/११’च्या आतंकवादी आक्रमणातील आरोपी, तसेच उत्तरप्रदेशातील हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांंची हत्या करणारे यांचा खटला लढवण्यासाठी अर्थपुरवठा केला गेला आहे. हा पैसा हलाल प्रमाणपत्रातून मिळत आहे. त्यामुळे मुंबईत १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी होणार्‍या हलाल परिषदेला पोलिसांनी अनुमती देऊ नये. अनुमती दिल्यास हिंदूंना रस्त्यावर उतरून या परिषदेला तीव्र विरोध करावा लागेल, अशी चेतावणी श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळीचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले यांनी दिली. श्री. भोसले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना त्यांच्या संघटनेची भूमिका मांडली.

श्री. प्रभाकर भोसले पुढे म्हणाले, ‘‘इस्लामिक जिमखाना येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी होणार्‍या ‘हलाल इंडिया शो’ या कार्यक्रमाला आमच्या संघटनेचा विरोध आहे. केंद्र सरकारची ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.एस्.आय्.) अन् राज्याचे ‘अन्न आणि औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) हे विभाग खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देतात. असे असतांना वेगळे प्रमाणपत्र देणे अवैध आहे. हलाल प्रमाणपत्रातून मिळणारा पैसा कशासाठी वापरला जातो?, याचे अन्वेषण व्हायला हवे. एखादा आरोपी निर्दोष असू शकतो; परंतु सर्व आरोपी निर्दोष कसे असू शकतात ? हलाल प्रमाणपत्रातून मिळणारा पैसा गोहत्या, लव्ह जिहाद यांतील आरोपींचे खटले लढवण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे या परिषदेला पोलिसांनी अनुमती देऊ नये.’’