ऋषि सुनक हिंदु असले, तरी त्यांचे हृदय आणि मेंदू ब्रिटीश आहे !

ब्रिटनचे भारतातील राजदूत अ‍ॅलेक्स अ‍ॅएलिस यांचे प्रतिपादन

ब्रिटनचे भारतातील राजदूत अ‍ॅलेक्स अ‍ॅएलिस

मुंबई – ऋषि सुनक हे हिंदु आहेत; मात्र त्यांचे हृदय आणि मेंदू पूर्णपणे ब्रिटीश आहे. ते भारतासाठी नाही, तर ब्रिटनसाठी काम करणार आहेत. ते ब्रिटनचे पंतप्रधान आहेत, असे प्रतिपादन ब्रिटनचे भारतातील राजदूत अ‍ॅलेक्स अ‍ॅएलिस यांनी येथे आयोजित ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव’ मध्ये केले. ‘भारत आणि ब्रिटन दोघे वेगवेगळे आहेत. त्यांच्यात फारच भेद आहे; मात्र दोघेही एकत्रितपणे त्यांच्या हितांसाठी काम करत रहातील, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

  • विदेशात भारतीय वंशांचे लोक मोठ्या पदावर पोचले की, भारतियांना त्याचा अभिमान वाटतो; मात्र अशा व्यक्ती भारतासाठी काही करण्याऐवजी ते रहात असलेल्या देशासाठीच प्रामाणिकपणे काम करतात, हेच यातून स्पष्ट होते !