मुंबई येथे भ्रमणभाष खेळाच्या माध्यमातून हिंदु मुलांचे होते धर्मांतर !

अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन सुलोचनादीदी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार !

६ जून या दिवशी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘वैज्ञानिक शोध पुराणांमध्येच लिहून ठेवल्याचे म्हणणार्‍यांशी कसा संवाद साधणार ?’ – हिंदुद्वेषी अभिनेते नसीरुद्दीन शाह

ज्या क्षेत्रातले आपल्याला ज्ञान नाही, त्या क्षेत्राविषयी आपले अज्ञान तरी प्रदर्शित करू नये, हा साधा नियमही न पाळणारे असे हिंदुद्वेषी स्वतःचे हासेच करून घेत आहेत !

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांचे निधन !

महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, फिल्मफेअर आदी पुरस्कारांनी सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना (वय ९४ वर्षे) यांचे ४ जून या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.

उष्णतेच्या लाटेमुळे नवी मुंबईतील शाळा १५ जूननंतर चालू करण्याची मागणी !

या निवेदनात त्यांनी ‘नवी मुंबईतील सर्व बोर्डाच्या शाळा १५ जूननंतर चालू करण्याच्या आदेशाचे पालन न करणार्‍या शाळांवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.

अश्वमेध यज्ञ हा व्यक्तीसह राष्ट्र निर्माणासाठी ! – रमेश बैस, राज्यपाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वगुरु करण्याचा संकल्प केला आहे. विश्व कल्याणासाठी हा यज्ञ आहे. भारताला बळकट बनवून हे ‘हिंदु राष्ट्र बनावे’ असे गायत्री परिवाराचे प.पू. गुरुदेवांचे स्वप्न होते.

१ जून ते ३१ जुलै या काळात खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी !

पावसाळ्यात मासळीच्या प्रजननाचा कालावधी असल्याने १ जून ते ३१ जुलै या २ मासांसाठी खोल समुद्रातील मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाने बंदी घातली आहे. या बंदीकाळामुळे उरणच्या करंजा आणि मोरा या बंदरावर शेकडो मासेमारी बोटी किनार्‍यावरच लावण्यात आलेल्या आहेत.

तिरुपति बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्‍यात येणार !

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्‍थान असलेल्‍या तिरुपति बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्‍यात येणार आहे. राज्‍य सरकारच्‍या सहकार्याने नवी मुंबईतील उळवे नोड येथील जागा यासाठी निश्‍चित करण्‍यात आली आहे.

भिवंडीत कॉलसेंटर चालवणारे आतंकवादी कह्यात

देशविघातक कारवाया करणार्‍या ‘एस्.एफ्.जे.’ या आतंकवादी संघटनेसाठी काम करणार्‍या टोळीचे भिवंडीतील कॉलसेंटर कर्णावती (अहमदाबाद) येथील सायबर सेलने उध्वस्त केले.