तिरुपति बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्‍यात येणार !

नवी मुंबई –देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्‍थान असलेल्‍या तिरुपति बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्‍यात येणार आहे. राज्‍य सरकारच्‍या सहकार्याने नवी मुंबईतील उळवे नोड येथील जागा यासाठी निश्‍चित करण्‍यात आली आहे. राज्‍य सरकारने ५०० कोटी रुपयांची जागा नवी मुंबईत बालाजी मंदिर उभारण्‍यासाठी दिली आहे. तिरुमला तिरुपति देवस्‍थानचे प्रमुख वाय.वी. रेड्डी यांनी ही माहिती दिली आहे. भूमीपूजन सोहळा ७ जून या दिवशी पार पडणार आहे. सोहळ्‍याला मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित केल्‍याची माहितीही त्‍यांनी दिली. प्रतिकृतीसाठी ७० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.