समाज, राष्ट्र यांना अनुकूल असे लिखाण साहित्यातून व्हावे ! – नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूक आणि रस्ते परिवहन मंत्री
समाजात चांगले-वाईट असे सर्वच असते; मात्र आपल्याला गुणात्मक परिवर्तन करणाऱ्या आणि विकासाची दिशा देणाऱ्या साहित्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यापुढील काळात समाज, राष्ट्र यांना अनुकूल असे लिखाण साहित्यातून व्हावे, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.