राज्यात केळी संशोधन केंद्राची स्थापना होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासह केळी संशोधन केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.

बुलढाणा येथे बस दरीत कोसळलली, प्रवासी सुखरूप !

बुलढाण्यामधील राजूर घाटात एक बस दरीत कोसळली. यामध्ये ५५ प्रवासी होते. यामध्ये २ विद्यार्थी किरकोळ घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

मुलींच्या वसतीगृहांच्या ठिकाणी महिला सुरक्षारक्षक नियुक्ती करण्याला प्राध्यान्य देणार ! – शंभूराज देसाई, मंत्री

जेथे मुलींची वसतीगृहे आहेत, तेथे महिला प्रबंधक  नियुक्त करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. वसतीगृहात सुरक्षारक्षकांची नियुक्ती बाहेरील एजन्सींकडून करण्यात येते.

यापुढे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी समयमर्यादा निश्चित करण्यात येईल ! – अतुल सावे, गृहनिर्माणमंत्री

यापुढे राज्यात झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी समयमर्यादा निश्चित करण्यात येईल. त्याविषयीचे विधेयक सभागृहात आणले जाईल. जे प्रकल्प वेळेत पूर्ण करणार नाहीत, त्या विकासकांना पालटण्याची तरतूद करण्यात येईल, असे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

नागपूर, अमरावती आणि मराठवाडा विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्‍यांच्या आत्महत्या !

नागपूर विभागात ९५७, अमरावती विभागात ३ सहस्र ४५२, तर मराठवाडा विभागात २ सहस्र ६८३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून विधानसभेत देण्यात आली.

डॉ. तात्‍याराव लहाने यांनी राजकारणामुळे त्‍यागपत्र दिल्‍याचा आरोप सरकारने फेटाळला !

डॉ. लहाने यांनी दिलेल्‍या त्‍यागपत्राविषयी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी २४ जुलैला याविषयी तारांकित प्रश्‍न उपस्‍थित केला होता.

सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारांचे ५० सहस्र कोटी रुपये देणे ! – बाळासाहेब थोरात, आमदार, राष्‍ट्रीय काँग्रेस

सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ एका नगर जिल्‍ह्यात ठेकेदारांचे ६२० कोटी रुपये देणे असून राज्‍यात ठेकेदारांचे ५० सहस्र कोटी रुपये देणे आहे, असा आरोप सदस्‍य बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत पुरवणी मागण्‍यांवरील चर्चेच्‍या वेळी केला.

अवैध व्‍यवसायांमध्‍ये कुणालाही पाठीशी घालणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

ज्‍या खेळांमुळे तरुण पिढी वाईट मार्गाला जाऊ शकते अशा खेळांची अथवा गुटख्‍यासारख्‍या पदार्थांचे विज्ञापन करावे का ? याविषयी प्रसिद्ध व्‍यक्‍तिमत्त्वांनी विचार करावा, असे आवाहन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले.

जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्‍याचे प्रकार खपवून घेणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

हिंदूंच्‍या मंदिरांमधील धर्मांधांचा हैदोस खपवून घेतला जाणार नाही, असा वचक पोलीस कधी निर्माण करणार ?

#Exclusive : ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे केंद्र राज्याबाहेर जाऊ न देता कोकणातच रहाणार !

‘‘रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हा सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत आपत्तीचा फटका बसतो. विशेषत: दरडप्रवण क्षेत्रात दुर्घटना घडतात. त्यामुळे ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण पथका’चे पथक रायगड येथेच स्थापन व्हावे, यासाठी राज्यशासन या प्रकरणात लक्ष घालेल.’’