इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे वारकर्‍यांच्या आरोग्याला धोका ! – दिलीप मोहिते पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे शुद्धीकरण न करता सांडपाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडले जाते. दूषित पाण्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

खासगी जागेत वीजमीटर बसतांना वनविभागाच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

खासगी जागेवर घर बांधतांना त्या ठिकाणी वीजमीटर घेण्यासाठी वनविभागाच्या नाहरकत दाखल्याची आवश्यकता नाही. भूमी वनविभागाची नसेल, तर अनुमतीची आवश्यकता नाही.

सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा यांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा लावण्यात यावी !- रवींद्र धंगेकर, आमदार, काँग्रेस

छत्रपती संभाजी महाराज यांचा राष्ट्रपुरुषांच्या सूचीत समावेश करावा, तसेच शाळा आणि सर्व शासकीय कार्यालये यांमध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात यावी.

..तर विधीमंडळ सभागृहाचे ‘मिडिया हाऊस’ होईल ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

सर्व सदस्यांनी बोलण्यासाठी हात उंचावल्यास कुणाला अनुमती द्यावी, याविषयी अध्यक्षांपुढे प्रश्न निर्माण होतो. बोलायला दिले नाही, तर सदस्य गोंधळ घालतात.

मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या !

राज्‍यातील शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍याविषयी आमदार कुणाल पाटील यांनी उपस्‍थित केलेल्‍या तारांकित प्रश्‍नावर सरकारकडून लेखी उत्तर देण्‍यात आले.

पुणे येथे पोलिसांच्या ५ सहस्र सदनिकांचे काम १५ वर्षे रखडले, पैशाच्या अपहाराप्रकरणी होणार अन्वेषण !

काम असेल चालू राहिले, तर हे काम काही वर्षांत पूर्ण होईल, असे वाटत नाही. या प्रकरणात पोलिसांच्या घरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामध्ये पोलिसांचे पैसे अडकले आहेत.

पालटणार्‍या राजकीय स्थितीमुळे विधीमंडळाच्या समित्या रखडल्या ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

विधीमंडळात दिलेली आश्वासनांची पूर्तता करणे, अहवालांचा अभ्यास करणे आदी काम समित्यांकडून केले जाते. नवीन सरकार स्थापन होऊन १ वर्ष झाले, तरी अद्याप या समित्यांची स्थापना करण्यात आलेली नाही.

५ सहस्र शेतकर्‍यांसाठी लवकरच जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

विविध योजनांद्वारे शेतकर्‍यांना लाभ देण्यात येत आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती याेजनेच्या अंतर्गत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.

अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना १० सहस्र रुपयांचे सानुग्रह अनुदान ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

ज्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे मृत्यू झाले आहेत त्या ठिकाणी मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपये तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. पुराच्या ठिकाणी रोगराई पसरू नये; म्हणून स्वच्छता करण्यात येणार आहे.

जानेवारी ते मे या कालावधीत महाराष्ट्रातील १९ सहस्र ५३३ महिला बेपत्ता ! – अनिल देशमुख, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

अनेक गोष्टींत प्रथम क्रमांक पटकावणारे आणि पुरोगामी म्हणण्यात येणारे  महाराष्ट्र राज्य महिलांसाठी मात्र असुरक्षित असणे, हे दुर्दैव !