दोन निष्पाप हिंदुत्वनिष्ठांची निर्दोेष मुक्तता झाल्याप्रकरणी आरोपींचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा अधिवक्त्यांच्या हस्ते सत्कार !  

गुजरात येथील बेस्ट बेकरी प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठ आरोपींच्या बाजुने खटला लढवून त्यांचे निर्दोषत्व उत्कृष्टपणे सिद्ध केल्याविषयी इचलकरंजी येथील अधिवक्त्यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पोलिसांनी शिकवल्‍यानुसार पंच नितीन जाधव साक्ष देत आहेत ! – अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्‍यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

संशयित आरोपीच्‍या अधिवक्‍त्‍यांनी समीर गायकवाड यांच्‍या अटकेचा पंचनामा करणारे पंच नितीन जाधव यांची उलट तपासणी घेतली. त्‍या वेळी पंच नितीन जाधव यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्तर न देता वेळकाढूपणा करत होते, तसेच एकाच प्रश्‍नाची वेगवेगळी उत्तरे देत होते.

मरणासन्न पुरोगामित्व आणि कोल्हापुरी हिंदुत्व !

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कोल्हापूर येथे माध्यम-घोषित कथित दंगलीची चर्चा आहे. यामध्ये पुरोगामित्वाचा फुटका ढोल बडवणारे आघाडीवर असले, तरी त्यांना तो बडवावा लागतो, यातूनच कोल्हापूरचे हिंदुत्वनिष्ठ स्वरूप स्पष्ट होत आहे. येथे पुरोगाम्यांना कळत नाही की, ‘कोल्हापूर पुरोगामी कि हिंदुत्ववादी ?

‘शासन आपल्‍या दारी’ योजनेच्‍या माध्‍यमातून एकाच ठिकाणी सर्व लाभ देण्‍याचा सरकारचा प्रयत्न ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

कोल्‍हापूरची माती ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पदस्‍पर्शाने पुनित झाली आहे. ही माती शौर्य शिकवते. हे सरकार सर्वसामान्‍यांना न्‍याय देणारे सरकार आहे. या सरकारने सिंचनाचे २९ प्रकल्‍प संमत केले असून ६६० लाख हेक्‍टर भूमी ओलिताखाली आणण्‍याचा संकल्‍प केला.

गर्भलिंग निदान चाचणीसाठी १५ सहस्र रुपये घेतांना रुग्‍णालय व्‍यवस्‍थापकास पकडले !

राजारामपुरी परिसरातील ‘श्री’ रुग्‍णालयावर महापालिकेच्‍या आरोग्‍य विभागाने १२ जून या दिवशी धाड टाकली. या प्रसंगी रुग्‍णालयाच्‍या व्‍यवस्‍थापकास गर्भलिंग निदान चाचणीसाठी १५ सहस्र रुपये घेतांना रंगेहात पकडण्‍यात आले.

‘शासन आपल्‍या दारी’ उपक्रम १३ जूनला दुपारी ४ वाजता तपोवन मैदान येथे होणार ! – दीपक केसरकर, पालकमंत्री, कोल्‍हापूर

‘शासन आपल्‍या दारी’ हा उपक्रम १३ जूनला दुपारी ४ वाजता तपोवन मैदान येथे होणार असून या उपक्रमासाठी जिल्‍ह्यातील ४० सहस्र लाभार्थी उपस्‍थित रहाणार आहेत. तरी यातील एकाही लाभार्थ्‍याची गैरसोय होऊ नये यांसाठी प्रशासनाने अल्‍पाहार, पाणी, भोजन, वाहतूक, आरोग्‍य पथक यांसह सर्व सोयी उपलब्‍ध करून द्याव्‍यात, असे निर्देश शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

कोल्‍हापूर येथील सनातनच्‍या साधकांचे १२ वीच्‍या परीक्षेत सुयश !

या संदर्भात कु. राज म्‍हणाला, ‘‘शाळेत शिक्षक शिकवत असतांना साक्षात् गुरुदेव आणि श्री सरस्‍वतीदेवी शिकवत आहे’, असा भाव ठेवला. याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला. प्रासंगिक सेवांमध्‍ये सहभागी होतो. त्‍यात फलक लिखाण, साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या वितरणाची सेवा केली.’’ आपल्‍या यशाविषयी कु. श्रावणी करी म्‍हणाली, ‘‘मी प्रतिदिन प्रार्थनेसमवेत ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करत असे. त्‍याचा लाभ झाला.

सर्व धर्मांचा आदर राखणे हे आपले कर्तव्‍य !

जिल्‍ह्यातील २०० हून अधिक मशिदींत झाले. शुक्रवारी नमाजानंतर सुमारे ४० मौलवी, धर्मगुरु यांच्‍या उपस्‍थितीत याविषयीच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या.

वर्ष २०१३ मध्ये गणेशोत्सव कालावधीत दाखलप्रविष्ट झालेल्या खटल्यात राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी निर्दाेष !

वर्ष २०१३ मध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत प्रविष्ट झालेल्या खटल्यातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर, शिवसेना पदाधिकारी आणि खंडोबा तालीमेचे कार्यकर्ते यांची जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता केली.

 बालिंगा (जिल्हा कोल्हापूर) येथे सराफाच्या दुकानावर फिल्मी स्टाईल सशस्त्र दरोडा !

एका मागोमाग एक दरोडे पडणे, हे गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचे द्योतक ! गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील !