कळवा येथे वृक्ष उन्‍मळून पडल्‍याने २ जण घायाळ !

या घटनेमुळे शहरातील वृक्षांचा प्रश्‍न पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला आहे. घायाळांना उपचारांसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे.

पुणे येथे ‘बी.आर्.टी.’ मार्गांवर बसगाड्यांची धडक !

चालकासह २९ प्रवासी किरकोळ घायाळ झाले आहेत. त्‍यांच्‍यावर ससून सर्वोपचार रुग्‍णालयामध्‍ये उपचार करण्‍यात आले. त्‍यामध्‍ये कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

नाशिक रोड येथील महापालिकेच्‍या रुग्‍णालयाची दु:स्‍थिती !

नाशिक रोड येथील महापालिकेच्‍या रुग्‍णालयाची दु:स्‍थिती , डोळ्‍यांच्‍या साथीच्‍या प्रतिबंधक औषधांचा तुटवडा !

प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍या हस्‍ते ठाणे येथील कर्करोग रुग्‍णालयाचा पायाभरणी सोहळा !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या महत्त्वाकांक्षी प्रकल्‍पांपैकी एक असलेला येथील कर्करोग रुग्‍णालयाचा पायाभरणी सोहळा प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍या हस्‍ते भूमीपूजन करून पार पडला.

मुंबई येथील नूर धर्मादाय रुग्णालयातील चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला ! – सौ. यामिनी जाधव, आमदार, शिवसेना

रुग्णांकडे दुर्लक्ष करणार्‍या खासगी, धर्मादाय किंवा कोणत्याही रुग्णालयांवर लोकप्रतिनिधींचा वचक असला पाहिजे, तरच लोकप्रतिनिधी याविषयी आवाज उठवतात, असा पायंडा पडेल. चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी ही लक्षवेधी मांडून आवाज उठवला आहे, असे प्रतिपादन शिवसेना आमदार सौ. यामिनी जाधव यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना केले.

डॉ. तात्‍याराव लहाने यांनी राजकारणामुळे त्‍यागपत्र दिल्‍याचा आरोप सरकारने फेटाळला !

डॉ. लहाने यांनी दिलेल्‍या त्‍यागपत्राविषयी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी २४ जुलैला याविषयी तारांकित प्रश्‍न उपस्‍थित केला होता.

डॉ. तात्याराव लहाने यांनी राजकारणामुळे त्यागपत्र दिल्याचा आरोप सरकारने फेटाळला !

डॉ. लहाने यांनी तडकाफडकी दिलेल्या त्यागपत्राविषयी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी २४ जुलै या दिवशी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

शासकीय, तसेच खासगी रक्तपेढ्यांतील रक्ताच्या दरात वाढ !

शासकीय रक्तपेढ्यांतून विकत मिळणार्‍या प्रतियुनिट रक्ताकरता पूर्वी ८५० रुपये द्यावे लागायचे. ते यापुढे १ सहस्र १०० रुपये देऊन विकत घ्यावे लागणार आहे.

पुणे येथील ‘रुबी हॉल’ मूत्रपिंड प्रत्‍यारोपण प्रकरणी ‘उच्‍चस्‍तरीय चौकशी समिती’ नेमली !

रुबी हॉल रुग्‍णालयातील मूत्रपिंड प्रत्‍यारोपण प्रकरणी राज्‍य सरकारने ‘उच्‍चस्‍तरीय चौकशी समिती’ नेमली आहे. या समितीच्‍या अध्‍यक्षपदी उच्‍च न्‍यायालयाचे निवृत्त न्‍यायाधीश चंद्रकांत भडंग यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

गरीब रुग्‍णांना सेवा नाकारणार्‍या धर्मादाय रुग्‍णालयांवर कारवाई करणार ! – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

गरीब रुग्‍णांना रुग्‍णसेवेची अट घालून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी रुग्‍णालयांसाठी महानगरपालिकेने जागा दिली; मात्र खासगी रुग्‍णालयांकडून त्‍याचे उल्लंघन होत असून पालिका रुग्‍णालये सुविधा पुरवण्‍यात अपुरी पडत आहेत.