भक्ताला अहंभाव नसणे

‘मी साधना करतो’, असा भक्ताला अहंभाव नसतो; कारण ‘त्याच्याकडून सर्व काही, म्हणजे साधनाही देवच करवून घेतो’, हे त्याला ज्ञात असते.’

‘आदर्श समाज’ दाखवा !

‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्‍या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळी देहली येथील साधकांना आलेल्या अनुभूती

‘सकाळी फिरायला जातांना ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटत होते. नंतर थोडासा पाऊस पडला. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या वाढदिवसाच्या दिवशी पावसाने त्यांचे स्वागत केले’, असे मला जाणवले.

‘परात्पर गुरुदेव सतत समवेत आहेत’, असा भाव अनुभवणारे सनातनचे संत पू. जयराम जोशी !

नोव्हेंबर २०२० मध्ये गाडी अकस्मात् घसरल्यामुळे आमचा अपघात झाला. त्यात माझ्या खांद्याचा अस्थिभंग झाला आणि यजमानांना खरचटले. गुरुदेवांच्या कृपेमुळे त्या वेळी रस्त्यावर इतर कोणतेही वाहन आले नाही. त्यामुळे आम्ही दोघेही वाचलो. ही केवळ गुरुमाऊलींची कृपा !

‘श्रीविष्णुतत्त्व जागृती’ भावसोहळ्याच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘आतापर्यंत परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे महाविष्णूचे अवतार’, असे वाटत असे; पण या सोहळ्याद्बारे परात्पर गुरुदेवांनी सर्व साधक-जिवांना ‘ते साक्षात् श्रीमहाविष्णुच आहेत’, याची प्रचीती दिली. या सोहळ्याद्बारे प्रत्येकाच्या मनात उत्कट भक्तीभावाचे बीज त्यांनी रोवले.

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या काळात राजस्थान येथील साधिकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा पहात असतांना माझा भाव जागृत होत होता. त्या दिवशी माझी प्रत्येक सेवा भावपूर्ण होत होती आणि माझे मन शांत होते.

‘माणूस’ कुणाला म्हणता येईल ?

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. ‘धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण करणे’, असे करणार्‍यांनाच ‘माणूस’ म्हणता येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

वाराणसी सेवाकेंद्रात सेवा करणारे श्री. राजाराम पाध्ये (वय ६३ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर श्री. राजाराम पाध्ये यांचा भाव जागृत झाला. ते म्हणाले, ‘‘माझी प्रगती केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने झाली.’’

आज झाला आम्हा आनंदीआनंद । ‘ज्योती’ झाली जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनी मुक्त ॥

१७.२.२०२० या दिवशी पुणे येथील साधिका सौ. ज्योती दाते यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी पुणे येथील साधिकांना सुचलेल्या कविता येथे दिल्या आहेत.