समितीच्या संपर्कात येण्यापूर्वी आम्ही अनाथ !

आज काही हिंदुत्वनिष्ठ संघटना म्हणतात, ‘‘हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात येण्यापूर्वी आम्ही अनाथ होतो. समितीने आम्हाला कडेवर घेतले, चालायला शिकवले आणि आज आम्ही जे काही आहोत, ते केवळ समितीमुळे आहोत. कृतज्ञता !’’

धर्मसंस्थापना आणि हिंदु राष्ट्र निर्मिती यांचे बीजारोपण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात, तसेच समाजातील अपप्रकार दूर करण्यासाठी व्यापक मोहिमा राबवून हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या दिशेने नेणारे समाजोद्धारक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !

हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी नवी पिढी सिद्ध करत असल्याविषयी कृतज्ञता !

आतापर्यंत २ बालक-संत आणि ६० टक्क्यांहून अधिक पातळीची २४४ आणि ९१६ अन्य दैवी बालके यांची समाजाला ओळख करून दिली आहे. प्रगल्भ बुद्धी आणि देवाची ओढ इत्यादी वैशिष्ट्ये असलेल्या दैवी बालकांच्या संदर्भात संशोधनकार्यही चालू आहे.

‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेविषयी आश्वस्त करणारे एकमेवाद्वितीय द्रष्टे हिंदूसंघटक !

हे सर्वज्ञानी, सर्वव्यापी भगवंता, तूच कर्ता करविता असलेल्या या हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आम्हाला सहभागी करून तुझ्या चरणांपर्यंत पोहोचण्याची संधी देत असल्याविषयी आम्ही अनंत कोटी कृतज्ञ आहोत !

अखंड कृतज्ञता…!

जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून कृतज्ञता व्यक्त करावी.

कृतज्ञतेचे महत्त्व

‘कर्मफलन्याय सिद्धांत’ सर्वांना लागू असतो. कृतज्ञता व्यक्त केल्याने कर्मफलत्याग होतो आणि कर्म अकर्म होते आणि देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही. त्यामुळे साधक जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता न्यून होते.

‘कोटी कोटी कृतज्ञता’ असे का म्हटले जाते ?

आपल्या प्रतिदिनच्या जगण्यातील, तसेच आयुष्यातील अनेक प्रसंग, घटना; किंबहुना प्रत्येकच गोष्टीविषयी कोटी कोटी म्हणजे अनंत कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती न्यूनच पडेल; म्हणून तर ‘कोटी कोटी कृतज्ञता’ असा शब्द वापरला जातो !

गुरु-शिष्य नात्यातील वीण घट्ट करणारा कृतज्ञताभाव !

माझ्यातील कर्तेपणा, अपेक्षा करणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे इत्यादी अहंच्या पैलूंमुळे माझा देवाण-घेवाण हिशोब वाढत रहायचा. त्यामुळे मी भवसागरातील सुख-दुःखाच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात होतो. माझी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याशी भेट झाल्यावर हे गणित हळूहळू सुटू लागले. त्यांच्यामुळे मला ठाऊक नसलेल्या ‘कृतज्ञता’या शब्दातील भाव हळूहळू उलगडत गेले.

सनातनच्या साधकांमध्ये आध्यात्मिक स्तरावरील गुणवैशिष्ट्ये निर्माण करत असल्याविषयी कृतज्ञता !

कोणत्याही संकटांना न डगमगण्याइतकी ईश्वरावरील श्रद्धा आणि व्यापकता, नम्रता ही काही निवडक आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अल्प-अधिक प्रमाणात सनातनच्या शेकडो साधकांमध्ये आहेत.

सर्वांगस्पर्शी चिरकाल टिकणारी ग्रंथसंपदा निर्मिल्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !

जीवन आणि साधना यांचे प्रत्येक अंग, तसेच मूलभूत सूत्रे यांविषयी मार्गदर्शन करणारे ग्रंथ सनातन संस्थेने प्रकाशित केले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव असलेल्या ग्रंथांची निर्मिती केल्याविषयी कृतज्ञ आहोत गुरुदेवा !