सर्वांगस्पर्शी चिरकाल टिकणारी ग्रंथसंपदा निर्मिल्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !

जीवन आणि साधना यांचे प्रत्येक अंग, तसेच मूलभूत सूत्रे यांविषयी मार्गदर्शन करणारे ग्रंथ सनातन संस्थेने प्रकाशित केले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव असलेल्या ग्रंथांची निर्मिती केल्याविषयी कृतज्ञ आहोत गुरुदेवा !

ईश्वराप्रती आभार व्यक्त करणे म्हणजे कृतज्ञता !

ईश्वराप्रती सतत आभार व्यक्त करत रहाणे, या अवस्थेला कृतज्ञतेचा भाव म्हणतात. कृतज्ञता सतत व्यक्त केल्याने कृतज्ञतेचा भाव जागृत होतो. गुरुकृपेने कृतज्ञतेचा भाव जागृत होतो आणि टिकून रहातो.

सहसाधकांची ‘समष्टी’ दिल्याविषयी कृतज्ञ आहोत !

हे भगवंता, आमच्या समवेत सेवा करण्यासाठी तू सहसाधकांची ‘समष्टी’ दिलीस. सहप्रवासी साधकांच्या संगतीनेच हा प्रवास आम्ही करू शकत आहोत. त्यांच्या सहकार्यानेच सेवा करणे शक्य होते. सहसाधकच आमचे गुण-दोष पारखू शकतात आणि आम्हाला त्याविषयी सांगू शकतात.

कृतज्ञता म्हणजे काय ?

जेथे जेथे ‘मी’चा विचार मनात असेल, तेव्हा ईश्वराविषयी किंवा त्याच्या कोणत्या तरी स्वरूपाविषयी जाणीव असणे आणि त्या जाणिवेचे श्रेयही ईश्वराला अर्पण करणे, याला ‘कृतज्ञता’ म्हणतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी हिंदुत्वनिष्ठांचाही कृतज्ञताभाव !

आक्रमक हिंदुत्व अंगीकारणारे, वैचारिक प्रबोधन करणारे, राजकीय क्षेत्रात वावरणारे, अगदी नेपाळसारख्या विदेशात कार्य करणाऱ्यांनाही ‘प.पू. डॉक्टरांमुळे कार्य करू शकलो’, म्हणून गहिवरून येत होते.

गुरुचरणी कृतज्ञता पुष्प !

गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्याची संधी मिळणे, हे साधकांचे भाग्य ! त्या कृतज्ञताभावात साधकांना सतत रहाता यावे, हाच या विशेषांकाचा उद्देश होय !

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने जगभरात १२ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा !

ॲलरोड येथे २३ जुलै या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक डॉ. मिलिंद खरे यांनी पौरोहित्य केले. या उत्सवाचा २५० हून अधिक साधकांनी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून लाभ घेतला.

नित्य साधना केल्याने शाश्वत विकास शक्य ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘व्यवसाय आणि व्यावसायिक पद्धती’ या विषयावरील संशोधन इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी प्रकाशित झालेले सनातनचे ग्रंथ आणि पहिले ‘इ-बूक’ !

व्यष्टी आणि समष्टी साधना, आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळाच्या अनुषंगाने उपाय या विषयांवर आधारित ग्रंथ हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.