सनातनच्या साधकांमध्ये आध्यात्मिक स्तरावरील गुणवैशिष्ट्ये निर्माण करत असल्याविषयी कृतज्ञता !

सनातन संस्था अल्पावधीत विश्वव्यापी होण्यामागेही प्रेमभाव, निरपेक्षपणे सतत कार्यरत रहाणे, स्वत:च्या गुण-दोषांविषयी सतत आत्मपरीक्षण आणि क्षमायाचना करणे, कोणत्याही संकटांना न डगमगण्याइतकी ईश्वरावरील श्रद्धा आणि व्यापकता, नम्रता ही काही निवडक आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अल्प-अधिक प्रमाणात सनातनच्या शेकडो साधकांमध्ये आहेत. ‘अध्यात्म कृतीत आणण्यासाठी आवश्यक असलेला समर्पणभाव साधकांमध्ये ठायीठायी आढळतो’, असे गौरवोद्गार एका संतांनी वर्ष २०१८ मध्ये काढले.