- अध्यात्माच्या विविध अंगांचा कार्यकारणभाव सांगून प्रत्येक कृतीविषयी ‘का अन् कसे ?’ यांची शास्त्रीय उत्तरे देणारे
- विज्ञानयुगातील वाचकांना समजेल अशा आधुनिक वैज्ञानिक भाषेत (उदा. सारणी, टक्केवारी) ज्ञान दणारे
- केवळ तात्त्विक विवेचनच नव्हे, तर काळानुसार साधना कृतीत आणण्याविषयी मार्गदर्शन करणारे
- वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेल्या प्रयोगांच्या लिखाणाचा अंतर्भाव असणारे
- कर्मकांडांप्रती आस्था असणार्यांना धर्मशास्त्र प्रतिपादन करणारे
- ‘सात्त्विक कला कशी जोपासावी’, याविषयीचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन देणारे
- राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसंबंधीचे
- हिंदु समाजाला सर्वदृष्ट्या आदर्श असणारे ईश्वरी राज्य स्थापण्याविषयी दिशादर्शन करणारे
- धार्मिक कृती अन् साधना यांचा व्यक्ती, वस्तू, वास्तू आणि वातावरण यांवर होणार्या चांगल्या-वाईट परिणामांच्या संदर्भातील सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया दर्शवणारी चित्रे अन् लिखाण यांचे ग्रंथ
जीवन आणि साधना यांचे प्रत्येक अंग, तसेच मूलभूत सूत्रे यांविषयी मार्गदर्शन करणारे ग्रंथ सनातन संस्थेने प्रकाशित केले आहेत. वरील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव असलेल्या ग्रंथांची निर्मिती केल्याविषयी कृतज्ञ आहोत गुरुदेवा !