कृतज्ञतेचे महत्त्व

१. अहं न्यून होणे : कृतज्ञतेमुळे कर्तेपण ईश्वर / गुरु यांना अर्पण होत असल्यामुळे अहं न्यून होण्यास साहाय्य होते. बऱ्याचदा प्रार्थना केल्यावर मनाप्रमाणे झाल्यास नंतर आपण कृतज्ञता व्यक्त करायला विसरतो. त्यामुळे अनुभूती किंवा आनंद मिळणे,  याचाही सूक्ष्म अहं साधकामध्ये येऊ शकतो; म्हणून अनुभूतीचे श्रेयही गुरूंना अर्पण करावे.

२. कर्म अकर्म होणे : ‘कर्मफलन्याय सिद्धांत’ सर्वांना लागू असतो. कृतज्ञता व्यक्त केल्याने कर्मफलत्याग होतो आणि कर्म अकर्म होते आणि देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही. त्यामुळे साधक जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता न्यून होते.