गोवा : कोलवाळ कारागृह प्रशासनाची कारागृहात अचानक तपासणी

कारागृह रक्षक आणि बंदीवान यांचे संगनमत असल्याविना भ्रमणभाष संच आणि इतर पदार्थ कारागृहात बंदीवानांपर्यंत कसे पोचतील ? अशा कारागृह रक्षकांना शोधून त्यांना कारागृहात टाका !

गोवा : फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. रूबेन डिसोझा सेवेतून बडतर्फ

वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारे आधुनिक वैद्य ! डॉ. रूबेन डिसोझा हे रुग्णांना विविध सेवा देण्यासाठी पैसे मागत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. प्रथमदर्शनी या आरोपांमध्ये तथ्य आढळले आहे.

गोवा : भारतीय तटरक्षक दलाचे संशोधन नौकेवर यशस्वी बचावकार्य : ३६ जणांचे प्राण वाचवले

प्रचंड कौशल्य आणि दृढ निश्चयाने आयसीजीएस् सुजीतने ‘सिंधु साधना’ नौकेला यशस्वीरित्या ‘टोईंग’ केले. दोन्ही नौका गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या असून २८ जुलै या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत त्या मुरगाव बंदरावर पोचण्याची अपेक्षा आहे.

गोवा : दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक २९ जुलैनंतर पूर्ववत् होणार

रेल्वेमार्गावर पडलेली दरड हटवून रेल्वेमार्ग आणि सेवा पूर्ववत् चालू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असले, तरी अर्धाअधिक बोगदा मातीने भरला असल्यामुळे रेल्वेसेवा पूर्ववत् होण्यास आणखी २ दिवस थांबावे लागणार !

म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र घोषित झाल्यास केवळ सहा कुटुंबांचेच पुनर्वसन करावे लागेल ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

म्हादई अभयारण्य आणि इतर परिसर व्याघ्रक्षेत्र घोषित झाल्यास सुमारे १५ सहस्र कुटुंबांवर त्याचा परिणाम होणार असल्याचा दावा पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी नुकताच केला होता. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलतांना पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी ही माहिती दिली.

जळलेल्या वनक्षेत्रात भूरूपांतर कदापि नाही ! – वनमंत्री विश्वजीत राणे

डोंगरमाथ्यावर आग लागल्यास ती विझवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत ? आगीची संभाव्य स्थळे निश्चित केली आहेत का ? आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली भूमी बांधकाम व्यावसायिकांच्या घशात जाऊ नये, यासाठी कोणती काळजी घेणार आहात ?

गोवा विद्यापिठात विद्या‘लया’स जात आहे का ?

गोवा विद्यापिठाचा घसरता दर्जा ही पुष्‍कळ चिंतेची आणि चिंतनीय गोष्‍ट आहे. कुणावरही दोषारोप न करता किंवा दायित्‍व न ढकलता या कारणांची साकल्‍याने मीमांसा होणे आवश्‍यक आहे.

विद्यार्थ्यांना ‘पेस्ट्री’च्या दुकानांतून अमली पदार्थांची विक्री ! – आमदार वेंझी व्हिएगस, गोवा

विद्यार्थ्यांना ‘पेस्ट्री’च्या दुकानांतून अमली पदार्थांची विक्री होत आहे. काही ‘पेस्ट्री’ दुकाने मारिजुआना हे अमली पदार्थ असलेले ‘ब्राऊनीस’ आणि ‘केक’ यांची विक्री करत आहेत. अशा दुकानांवर पोलिसांनी धाड टाकावी.

गोवा : नूतनीकरण केलेल्या सप्तकोटीश्वर मंदिराच्या छताला गळती

पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई, स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासह मंदिराला भेट देऊन छतावरून होणार्‍या पाण्याच्या गळतीसह पाण्याचा निचरा होण्यात येणार्‍या अडचणी, परिसरात पाण्यामुळे झालेली निसरड आदींची पहाणी केली.

गोवा : करंझोळला रेल्वेमार्गावर दरड कोसळली 

संततधार पडणारा पाऊस आणि त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने, तसेच जमीन फुगल्याने, दूधसागर ते कॅसलरॉक यामधील करंझोळ रेल्वेस्थानकाच्या ब्रागांझा घाटात दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली.