गोवा : फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. रूबेन डिसोझा सेवेतून बडतर्फ

रुग्णांकडून पैसे घेत असल्याच्या अनेक तक्रारींनंतर कारवाई

पणजी, २७ जुलै (वार्ता.) – आरोग्य खात्याने फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील (आय.डी. रुग्णालय) ज्येष्ठ ‘सर्जन’ डॉ. रूबेन डिसोझा यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. सरकारी सेवेत असतांना रुग्णांकडून पैसे घेत असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

आरोग्य खात्याने आदेशात म्हटले आहे की, डॉ. रूबेन डिसोझा हे रुग्णांना शस्त्रक्रिया, ‘ड्रेसिंग’, खासगी खोली उपलब्ध करून देणे आदी सेवा देण्यासाठी पैसे मागत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. प्रथमदर्शनी या आरोपांमध्ये तथ्य आढळले आहे.

संपादकीय भूमिका

वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारे आधुनिक वैद्य !