सनातनचे संत पू. चत्तरसिंग इंगळे यांच्या पार्थिव देहावर फोंडा येथे भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार !

मूळचे दुर्ग (छत्तीसगड) येथील आणि  सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळे (वय ९२ वर्षे) यांनी २९ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजता देहत्याग केला.

गोव्यातील खाण लिजांचे ४ खाणपट्टे लिलावात

साडेचार वर्षांनंतर राज्यशासनाने खाण लिजांचे ४ खाणपट्टे लिलावात काढले आहेत. यामध्ये उत्तर गोव्यातील डिचोली, मये आणि शिरगाव, तर दक्षिण गोव्यातील काले, अशा खाणपट्ट्यांचा समावेश आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोव्यात आणले जाणारे ‘ब्लॅक कोकेन’ जप्त

अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एन्.सी.बी.) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोलिव्हियाच्या एका महिलेकडून १५ कोटी रुपये किमतीचे ३.२ किलोग्रॅम वजनाचे ‘ब्लॅक कोकेन’ जप्त करण्यात आले. हे अमली पदार्थ गोव्यात आणले जाणार होते, असे अन्वेषणातून आढळून आले आहे.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात उत्कृष्ट प्रतीचा गांजा आणि चरस उपलब्ध होत असल्याची बंदीवानाची माहिती

प्रसिद्धीमाध्यमे आणि इतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विक्रीच्या जाळ्यासंबंधी अन्वेषण करण्यासाठी पोलिसांना कारागृहातील अधिकारी सहकार्य करत नसल्याचे समजते.

गोव्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अनेक वर्षांपासून सक्रीय

याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार करूनही गोवा पोलीस त्यांच्यावर कारवाई सोडाच चौकशीही करत नव्हते, हे दुर्दैव !

‘पी.एफ्.आय.’वरील बंदीसाठी केंद्रशासनासह राष्ट्रवादी नागरिक आणि संघटना यांचेही अभिनंदन ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, भारत माता की जय संघ

‘पी.एफ्.आय.’ची राजकीय शाखा ‘एस्.डी.पी.आय.’ ही संघटना गोव्यातही फातोर्डा येथे स्थापन झालेली आहे. सरकारने त्यांचीही सखोल चौकशी करून त्यांना कह्यात घ्यावे.

गोव्यात पी.एफ्.आय.’चे कार्य करणार्‍या सदस्यांवर कायदेशीर कारवाई करू ! – अभिषेक धनिया, पोलीस अधीक्षक, दक्षिण गोवा

या संघटनेचे कार्य करतांना कुणी आढळल्यास त्या संघटनेतील सदस्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. या संघटनेच्या सदस्यांवर आम्ही लक्ष ठेवले आहे.’’

बागा, कळंगुट येथे बांगलादेशी चालवत आहेत उपाहारगृह !

बागा, कळंगुट येथे एक बांगलादेशी महिला आणि तिचा १८ वर्षांचा मुलगा ‘झायका’ हे एक उपाहारगृह चालवत आहेत. याविषयी माहिती मिळाल्यानंतर कळंगुट पोलिसांनी या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यास आरंभ केला आहे.

गोव्यात पेडामळ, केपे येथे परप्रांतीय मुसलमानांची दीडशेहून अधिक घरे

राज्यात सध्या सरकारने बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढून त्यांना मायदेशी पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पेडामळ, केपे येथे ‘कारगिल’ झोपडपट्टीत संशयास्पद हालचालींना वेग आला आहे.

नगरनियोजन कायद्यातील प्रस्तावित सुधारणा विरोधामुळे रहित करण्याचा सरकारचा निर्णय

नगरनियोजन कायद्यातील प्रस्तावित सुधारणा आणि कलम १६ अंतर्गत सर्व प्रकरणे रहित करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सुपुर्द करण्यात येणार असल्याची घोषणा नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी केली आहे.