गोव्यात पेडामळ, केपे येथे परप्रांतीय मुसलमानांची दीडशेहून अधिक घरे

  •  संशयास्पद हालचालींना वेग आल्यामुळे  स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

  •  अवैध बांधकाम असूनही सर्वांना वीज आणि पाणी यांची जोडणी

  •  रात्री-अपरात्री कर्नाटक आणि केरळ राज्यांतील वाहनांची सातत्याने वर्दळ

मडगाव, २६ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात सध्या सरकारने बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढून त्यांना मायदेशी पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पेडामळ, केपे येथे ‘कारगिल’ झोपडपट्टीत संशयास्पद हालचालींना वेग आला आहे. झोपटपट्टीत रहाणार्‍यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. झोपडपट्टीतील संशयास्पद हालचालींमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वस्तीत रहाणार्‍या लोकांनी खोल्या बांधून त्या परप्रांतीय मुसलमानांना भाड्याने दिल्या आहेत. या सर्व प्रकाराचे अन्वेषण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

केपे शहरापासून १० कि.मी. अंतरावर शिरवई हा भाग आहे आणि शिरवाईच्या डोंगरमाथ्यावर पेडामळ हा गाव आहे. पेडामळ येथे काही वर्षांपूर्वी झोपडपट्टी उभारण्यात आली होती. आता त्या ठिकाणी पक्की घरे आणि घरांना पाणी आणि वीज यांचा पुरवठा केला जात आहे. (अवैध बांधकामांना लाच घेऊनच पाणी आणि वीज यांचा पुरवठा केला जात असणार, हे वेगळे सांगायला नको ! – संपादक) येथे पूर्वी २५ घरे होती, तर आता तेथे दिडशेहून अधिक घरे आहेत. येथे वास्तव्य करणार्‍यांकडे भूमीची कागदपत्रे नाहीत. राजकारण्यांच्या पाठिंब्यामुळे ही अनधिकृत लोकवस्ती फोफावली आहे. येथील घरांवर हिरव्या रंगाचे झेंडे आहेत आणि अनेकांच्या दारात आलिशान गाड्या आहेत. या ठिकाणी रात्रीअपरात्री कर्नाटक आणि केरळ राज्यांतील वाहनांची सातत्याने वर्दळ असते. या ठिकाणी रहाणारे लोक स्थानिक लोकांशी कोणताही संबंध ठेवत नाही. या ठिकाणी पूर्वी जुनी चिर्‍यांची खाण बुजवून त्यावर मदरसा उभारण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र लोकांच्या विरोधामुळे हा प्रयत्न फसला. झोपडपट्टीत एका घराच्या खोलीत मदरसा चालू करण्यात आला आहे; मात्र प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांना याविषयी कोणतीच माहिती नाही. (असे होऊच शकत नाही. ज्याअर्थी या घरांना वीज आणि पाणी आहे, त्याअर्थी प्रशासनाला या वस्तीची माहिती आहे. पोलिसांना २५ घरांची दिडशे घरे होईपर्यंत या वस्तीची माहिती नसल्यास तो निद्रिस्तपणाचा कळस म्हणायला हवा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

संकट दारात पोचले, तरी निद्रिस्त राहिलेले हिंदू !

वीज आणि पाणी यांची जोडणी देणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी ! देशातील भ्रष्टाचारच आतंकवाद्यांना आणि बांगलादेशी घुसखोरांना पोसत आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरू नये !