संजीवनी साखर कारखान्याच्या प्रश्नावरून आमदार सुदिन ढवळीकर आणि प्रसाद गावकर यांचे विधानसभेत ठिय्या आंदोलन

‘मगोप’चे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत जेवणाच्या सुटीत सभागृहात ठिय्या मांडला. या वेळी सांगेचे आमदार श्री. प्रसाद गावकर यांनीही आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांना पाठिंबा दिला.

राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जावरून विरोधकांनी सरकारला केले लक्ष्य !

पत्रादेवी ते काणकोणपर्यंत चालू असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट प्रतीचे होत असल्याविषयी १८ ऑक्टोबर या दिवशी अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी प्रश्नोत्तर तासाच्या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभु पाऊसकर यांना धारेवर धरले.

गोवा विधानसभेच्या अखेरच्या अधिवेशनाला गदारोळात प्रारंभ

माहिती देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा विरोधकांचा आरोप, गोव्यातील वाढती गुन्हेगारी आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचा मृत्यू होणे, या सूत्रांवरून विरोधी सदस्यांनी सरकारला केले लक्ष्य !

वादग्रस्त ‘भूमीपुत्र अधिकारिणी विधेयका’चा कायदा विभाग अभ्यास करणार

हे विधेयक शासनाने नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधकांचा तीव्र विरोध डावलून संमत केले होते.

२८ जुलैपासून गोवा विधानसभेचे ३ दिवसीय अधिवेशन

पक्षांतरविरोधी विधेयक मांडण्यास संमती न देणे हे धक्कादायक

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि पालिका निवडणूक आचारसंहिता यांमुळे विधानसभा अधिवेशन १९ जुलैपर्यंत स्थगित

शासनाने विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १९ जुलैपर्यंत स्थगित केले आहे ते १६ एप्रिलपर्यंत चालणार होते

नवीन शैक्षणिक धोरण राबवतांना अनुदानित शाळांचे व्यवस्थापन सरकार कह्यात घेणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. धोरण राबवतांना पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक स्तरावर ‘फाऊंडेशन कोर्सेस’ प्रारंभ करण्यात येणार आहेत….

मातृभाषेतील शाळांसाठी घोषित केलेले प्रोत्साहन अनुदान आणि प्रतिविद्यार्थी ४०० रुपये अनुदान यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करा ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, राज्य निमंत्रक, भा.भा.सु.मं.

मातृभाषेतील शाळांसाठी घोषित केलेले प्रोत्साहन अनुदान आणि प्रतिविद्यार्थी ४०० रुपये अनुदान यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी भारतीय भाषा सुरक्षा मंचचे (‘भा.भा.सु.मं.’चे) राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सरकारकडे केली.

शासनाने ७ हॉटेलमालकांना आरामकरात नियमबाह्यरित्या १ कोटी ४५ लाख रुपये सूट दिली ! – महालेखापालांचे ताशेरे

शासनाने ७ हॉटेलमालकांना आरामकरात (लक्झरी टॅक्स) नियमबाह्यरित्या १ कोटी ४५ लाख रुपये सूट दिली. ही माहिती ‘कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया’ (कॅग) यांच्या ‘ऑडिट’ अहवालात नमूद केली आहे. ‘कॅग’ने हा ‘ऑडिट’ अहवाल २९ जानेवारी या दिवशी विधानसभेत मांडला आहे.

राज्यात तिसर्‍या जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी करणारा ठराव २३ विरुद्ध ८ मतांनी फेटाळण्यात आला

फोंड्याचे आमदार रवि नाईक यांनी सत्तरी, फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यांचा मिळून राज्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा खासगी ठराव विधानसभेत मांडला होता. हा ठराव अखेर २३ विरुद्ध ८ मतांनी विधानसभेने फेटाळला.