गोवा विधानसभा अधिवेशन
पणजी – देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याची सामाजिक आणि आर्थिक कामगिरी अतिशय प्रभावी आहेत, असे उद्गार गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी विधानसभेला संबोधित करतांना काढले. राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात राज्याच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेतला.
(सौजन्य : DD News Panaji)
Address by the Goa Governor in the winter session of the Goa Assembly
ते पुढे म्हणाले,
१. गोव्याचे दरडोई उत्पन्न देशात सर्वाधिक आहे, जे एक गतीशील आणि निरोगी अर्थव्यवस्थेचे चित्रण आहे.
२. डिजिटल व्यवहाराच्या संख्येत गोवा राज्याचे वीज खाते देशात दुसर्या क्रमांकावर आहे.
३. कोरोना महामारीनंतर गोवा पर्यटकांच्या आगमनाच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वर्ष २०२२ मध्ये (सप्टेंबर २०२२ पर्यंत) ४९ लाख ५५ सहस्र देशी आणि ९५ सहस्र विदेशी पर्यटकांनी राज्याला भेट दिली.
४. गोव्यातील जी-२० परिषदेमुळे राज्याला गोव्यातील उत्पादने आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
५. राज्यातील गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण ८४ टक्के आहे.
६. राज्याचे एकूण लागवड क्षेत्र १ लाख ४४ सहस्र ४९८ हेक्टर आहे. चालू आर्थिक वर्षात (नोव्हेंबर २०२२ पर्यंत) शेतकर्यांना १८ कोटी ५८ लाख रुपये अनुदान म्हणून देण्यात आले.
७. गोवा राज्य औद्योगिक वाढ आणि गुंतवणूक प्रोत्साहन धोरणाचे उद्दिष्ट ३० सहस्र नोकर्या निर्माण करणे आणि ५ वर्षांच्या कालावधीत राज्यात २० सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक आणणे आहे.
८. सखल शेतात क्षारयुक्त पाण्याचा प्रवेश रोखण्यासाठी अधिसूचित खाजन बंधार्यांची दुरुस्ती करण्यात आली. अंदाजे ३ किलोमीटर बंधार्यांच्या दुरुस्तीद्वारे सुमारे १७८ हेक्टर खाजन भूमी संरक्षित करण्यात आली.