वेद काळात मूळ हिंदु धर्मानुसार वर्षप्रतिपदा (गुढीपाडवा), श्री गणेशचतुर्थी, दसरा, दीपावली आणि हुताशनी (होळी) हे फक्त ५ उत्सव होते. या उत्सवांचे त्या काळी पुष्कळ महत्त्व होते. दिवाळी हा मानवाचा दयास्वरूप सण आहे. आश्विन कृष्ण पक्ष द्वादशीपासून भाऊबीजेपर्यंत, गोधनापासून भावा-बहिणींपर्यंत सर्वांना आनंद मिळावा, यासाठी हा सण साजरा करायचा असतो.