शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून धाडी !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांमध्ये १०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस !

३१ ऑगस्ट या दिवशी परब यांना ईडीच्या कार्यालयात उपस्थित रहाण्याचे सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची ५ कोटी रुपयांची मालमत्ता कह्यात !

काही दिवसांपूर्वी खडसे यांच्या संदर्भातील झोटिंग समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गायब झाला होता. हा अहवाल सापडला असून त्यात एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले होते.

अनिल देशमुख यांच्या सहकार्‍यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडून आरोपपत्र प्रविष्ट !

शिंदे आणि पालांडे यांच्या समवेत अनिल देशमुख यांची चौकशी करायची असल्याचे न्यायालयात सांगून अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांना चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी समन्स पाठवला आहे.

न्यायालयीन प्रक्रियेविना चौकशीला जाणार नाही ! – अनिल देशमुख

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जाऊन त्यांना सहकार्य करीन. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याविना मी चौकशीला जाणार नाही, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली.

‘ईडी’कडून माजी आमदार विवेक पाटील यांची २३४ कोटी रुपयांची स्थावर संपत्ती जप्त !

कर्नाळा नागरी सहकारी बँक अपहार प्रकरणी १७ ऑगस्ट या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांची तब्बल २३४ कोटी रुपयांची स्थावर संपत्ती जप्त केली आहे.

अनिल देशमुख यांना अन्वेषणाला उपस्थित रहाण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स !

अनिल देशमुख यांनी कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी केलेला अर्ज सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे आता अंमलबजावणी संचालनालयाकडे अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याविना देशमुख यांच्यापुढे कोणताही पर्याय राहिलेला नाही.

मुख्यमंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकांना ईडीकडूनच्या चौकशीची धमकी !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने ‘व्हॉट्सॲप’ संदेशाद्वारे ‘तुमची अंमलबजावणी संचालनालयाद्वारे (ईडी) चौकशी करायला लावू’, अशी धमकी दिली.

अपव्यवहाराच्या प्रकरणी व्यावसायिक अविनाश भोसले यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त !

‘ईडी’ने यापूर्वीच भोसले यांच्यासह कुटुंबाची जवळपास ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ही सर्व मालमत्ता समभागांच्या स्वरूपात होती.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील उपाहारगृहावर ‘ईडी’ची धाड ! 

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ७ ऑगस्ट या दिवशी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर्धा मार्गावर असलेल्या ‘ट्रव्होटेल’ उपाहारगृहावर धाड टाकली आहे.