पुणे – परकीय चलन अपव्यवहाराच्या प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ४ कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) जप्त केली आहे. ही कारवाई शिवाजीनगर येथील गणेशखिंड येथे असलेल्या ‘अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.’ या मालमत्तेवर करण्यात आली. भोसले यांच्यावर ‘फेमा’ (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट १९९९) कायद्यांतर्गत कारवाई केली असून सप्टेंबर २०१९ पासून चौकशी चालू आहे. ‘ईडी’ने यापूर्वीच भोसले यांच्यासह कुटुंबाची जवळपास ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ही सर्व मालमत्ता समभागांच्या स्वरूपात होती.