अनिल देशमुख यांच्या सहकार्‍यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडून आरोपपत्र प्रविष्ट !

अंमलबजावणी संचालनालय

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपाच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने जुलै २०२१ मध्ये कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अन्वेषणासाठी बोलावून कह्यात घेतले होते. सध्या दोघेही अटकेत आहेत. शिंदे आणि पालांडे यांच्या समवेत अनिल देशमुख यांची चौकशी करायची असल्याचे न्यायालयात सांगून अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांना चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी समन्स पाठवला आहे; मात्र ५ वेळा समन्स पाठवूनही अद्याप ते चौकशीसाठी उपस्थित राहिलेले नाहीत.