तिस्ता सेटलवाड विचारवंत कि अविचारवंत ?

ज्या वेळी हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात कारवाई होते, तेव्हा राज्यघटनेचे गोडवे गातांना जी मंडळी थकत नाहीत, ती मंडळी सेटलवाड यांच्यासारख्यांवर कारवाई झाल्यावर मात्र ‘अटक घटनाबाह्य’ अशा प्रकारे टीका करतांना दिसतात. अशांनी न्यायव्यवस्थेचा निर्णय स्वीकारून राज्यघटनेवरील निष्ठा दाखवून द्यायला हवी.

भारताला मिळालेला धडा !

इराण आणि तैवान या देशांनी आसाममधून निर्यात केलेला सुमारे ४० सहस्र किलो चहा परत केला आहे. चहामध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक कीटकनाशके असल्याचे कारण त्यांनी दिले. यामुळे भारतात ५३ टक्के चहाचे उत्पादन करणाऱ्या आसामच्या उत्पादकांची पुष्कळ हानी झाली आहे.

सावधान ! २०४७ मध्ये ‘दार-उल-इस्लाम’ !

भारताला वर्ष २०४७ मध्ये इस्लाममय करणारी कारस्थाने घडत असतांना भारताने या विरोधात काही केले नाही, तर ‘दार-उल-हरब’ (जेथे इस्लामचे राज्य नाही, ते) असलेले हिंदुस्थान ‘दार-उल-इस्लाम’ (इस्लामचे राज्य असलेली भूमी) व्हायला वेळ लागणार नाही ! हिंदूंनो, जागे व्हा अन्यथा ‘दुसरे लेबेनॉन’ पहायला सिद्ध रहा !

पहिले पाढे पंचावन्न !

‘आगामी काळात त्यांचे तांडव पहायला मिळू शकते’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. त्याचे रौद्ररूप पहाण्याची वेळ ओढवून घेण्यापेक्षा वेळीच जागे होण्यातच शहाणपण आहे. निसर्गरक्षणाचा संकल्प करून कृती केली, तर निसर्गदेवही आशीर्वाद दिल्याविना रहाणार नाही !

गुरुतत्त्व आणि राष्ट्रहित !

कठोर प्रयत्न करून गुरुकृपा संपादन केलेल्यांविषयीची शेकडो उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. हे लक्षात घेऊन शिष्योत्तम म्हणजेच स्वतः सक्षम भक्त बनून राष्ट्रासाठी समर्पित होता यावे, यासाठी आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी गुरुचरणी प्रार्थना करून त्यांच्या कृपेस पात्र होऊया !

कारागृहांतील गुन्हेगारी !

जर कुंपणच शेत खात असेल, तर देशातील कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाणार ? गुन्हेगार कारागृहात असतांना तो तेथे ऐषारामात जीवन जगत असेल, तर ‘त्याने ज्यांच्यावर अन्याय केला, त्यांना न्याय मिळाला’, असे कधीतरी म्हणता येईल का ?

श्रीलंकेतील अराजक !

‘श्रीमंत आणि पुढारलेले म्हणवणारे पाश्चात्त्य देश कसे वागतात ?’ हे भारतानेही लक्षात ठेवून त्यांच्याकडे हात पसरणे बंद केले पाहिजे. भारतावरही एकूण कर्ज ४५१ अब्ज ९५ कोटी ५८ लाख रुपये एवढे आहे. याची नोंद घेऊन कर्ज फेडण्यासाठी वेगवान उपाययोजना काढण्यासह सर्वच गोष्टींत स्वयंपूर्ण होण्यावरही भर दिला पाहिजे, हे निश्चित !

भारतीय राजकारण्यांना लोकशाहीचा धडा !

लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल अशा अनेक रत्नांऐवजी काँग्रेसने दगड निवडले. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, आरक्षण आदी अनेक सोंगे आणून काँग्रेसने देशातील बहुसंख्य हिंदूंना मूर्ख बनवले. आज इतक्या वर्षांनी काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे !