गुरुपौर्णिमेला १८ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १८ दिवस शिल्लक

शिष्यात मुमुक्षुत्व असले, तर त्याच्या चुका झाल्या तरी गुरु त्याला सांभाळून घेतात. शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय. शिष्य जरी गुरूंवर खूप रागावला असला, तरी गुरु मात्र त्याला सांभाळून घेतात. एका शिष्याने एकदा त्यांच्या गुरूंच्या छायाचित्रावर रागाने जोडे ठेवले, तरी ते त्याच्यावर रागावले नाहीत, तर त्याला पूर्वीसारखेच प्रेम दिले.

गुरुपौर्णिमेला १९ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला १९ दिवस शिल्लक

गंगेमुळे पाप, शशी (चंद्रा) मुळे ताप (मानसिक तणाव) आणि कल्पतरूमुळे दैन्य (दारिद्र्य) नाहीसे होते. याउलट श्री गुरुदर्शनाने पाप, ताप अन् दैन्य या तिन्ही गोष्टींचे हरण होते, म्हणजेच हे तिन्ही त्रास दूर होतात. – श्री गुरुचरित्र १३:१३०

गुरुपौर्णिमेला २० दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला २० दिवस शिल्लक

श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणार्‍या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही. त्यांना परिसाची उपमा दिली, तरी तीही अपुरी पडेल; कारण परीस लोखंडास सुवर्णत्व देत असला, तरीही त्याचे परीसत्व देऊ शकत नाही.’’

गुरुपौर्णिमेला २१ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला २१ दिवस शिल्लक

बिंब-प्रतिबिंब न्यायाने शिष्याच्या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्या मनात उमटून त्यांना शिष्याचे विचार कळतात. ते विचार शिष्याच्या उन्नतीसाठी पोषक असल्यास गुरु त्यानुसार वागतात.