पूरग्रस्तांसाठी सरकारकडून केवळ १ सहस्र ५०० कोटी रुपयांचेच तातडीचे साहाय्य ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

डावीकडून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – पूरस्थितीनंतर पुनर्बांधणीसाठी ३ सहस्र कोटी रुपये आणि सौम्यीकरण उपाययोजनांसाठी ७ सहस्र कोटी असे १० सहस्र कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष साहाय्य केवळ १ सहस्र ५०० कोटी रुपये इतकेच दिसून येते. शेतकर्‍यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला प्रथमदर्शीतरी कोणतेही साहाय्य केल्याचे दिसून येत नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. २ ऑगस्ट या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ११ सहस्र ५०० कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज घोषित करण्यात आले. त्याविषयी फडणवीस यांनी वरील प्रतिक्रिया दिली.