लोकसभा सचिवालयाकडून ‘असंसदीय’ शब्दांची सूची घोषित !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रशासनाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून चालू होत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाकडून ‘असंसदीय’ शब्दांची सूची जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या कामकाजाच्या प्रक्रियेत जर अध्यक्षांना एखादा शब्द अपमानजनक किंवा असंसदीय वाटला, तर तो शब्द हटवण्यासाठी ते आदेश देतात. नियम ३८१ नुसार सभागृहाच्या कार्यवाहीचा एखादा भाग हटवायचा असेल, तर तो अध्यक्षांच्या आदेशाने हटवण्यात येतो. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांनी या निर्णयावर तीव्र नापसंती प्रकट केली असून ते हे शब्द वापरणार असल्याचे त्यांच्या नेत्यांनी म्हटले आहे.

बंदी घालण्यात आलेल्या काही ‘असंसदीय’ शब्दांची सूची !

हिंदी शब्द : गद्दार, शकुनी, विश्‍वासघात, दलाल, भ्रष्ट, चांडाल चौकडी, कमीना, काला सत्र, खून की खेती, दोहरा चरित्र, तानाशाही, तानाशाह, अराजकतावाद आदी.

इंग्रजी शब्द : Ashamed, Abused, betrayed, corrupt, drama, hypocrisy, incompetent